पी.सी.ओ.एस. म्हणजे काय? आणि त्यावर उपाय आहेत का?
हल्ली अनेक मुलींमध्ये पी.सी.ओ.एस.च्या (Polycystic Ovary Syndrome – PCOS) समस्या वाढताना दिसून येत आहे. पी.सी.ओ.एस. बदलत्या जीवनशैलीमुळे, तर काहींना अनुवांशिक घटकांमुळे होतो. मातृत्वाची इच्छा बाळगणाऱ्या महिलांना पी.सी.ओ.एस.मुळे गर्भधारणेस अडचणी येत असेल तर असे का होते? आणि त्याचे स्वरूप काय? हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम पी.सी.ओ.एस.ची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पी.सी.ओ.एस. म्हणजे काय?
पॉलीसिस्टिक ओव्हरीज सिंड्रोम (पीसीओएस) ही महिलांमध्ये प्रजननक्षमतेच्या अंतःस्रावी समस्या आहे. आजकाल सुमारे ५-१०% तरुण स्त्रिया या समस्येने त्रस्त असून, गर्भधारणेमध्ये अडचणी निर्माण करतात. पीसीओएसग्रस्त महिलांना अनियमित मासिक पाळी, केसांची असामान्य वाढ, मुरुमं तसेच ओवेरीयन सीस्ट म्हणजे गर्भाशयात गाठ येणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.
समस्या निर्माण होण्याचे कारण काय?
ही समस्या अनुवंशिक आणि जीवनशैलीमुळे ऊद्भवत असल्याचे म्हंटले जाते. या संदर्भातील अभ्यासानुसार पीसीओएसग्रस्त महिलांमध्ये इन्सुलिन प्रतिरोधक प्रमाण जास्त असते. रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढल्याने, गर्भाशय अधिक टेस्टोस्टेरॉन बाहेर काढतात. या अतिरिक्त टेस्टोस्टेरॉनमुळे अनियमित मासिक पाळी आणि केसांची अवांछित वाढ होते. काही स्त्रियांमध्ये पीसीओएस शरीराच्या इतर संप्रेरकांमधील असंतुलनामुळे उद्भवते.
पीसीओएस होण्याचे कारण माहित नसले, तरी त्याचे विशिष्ट लक्षणे आपण जाणून घेऊ शकतो.
पी.सी.ओ.एस.ची लक्षण काय आहेत?
पीसीओएसमध्ये अँड्रोजेनच्या (पुरुष हार्मोन्स) अतिरिक्त प्रभावामुळे दुष्परिणाम होतात. जर तुम्ही पीसीओएसने ग्रस्त असाल तर वजन वाढ, अनियमित मासिक पाळी, केसांची वाढ तसेच मुरुमांसारखी लक्षणे तुमच्यामध्ये दिसू लागतात.
आता आपण पीसीओएस प्रजनन क्षमतेवर कशाप्रकारे परिणाम करू शकतो, याबद्दल जाणून घेऊ.
पी.सी.ओ.एस.आणि वंध्यत्व
पीसीओएसचा प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. पीसीओएसग्रस्त महिलांमध्ये स्त्री बीजाची उत्पत्ती होऊ शकत नाही. गर्भाशयामधील एस्ट्रोजेनच्या अतिउत्पादनामुळे, प्रजननासाठी महत्वपूर्ण असलेले बीजांडच जर नियमित तयार होत नसेल, तर गर्भधारणा अशक्य आहे.
१. मासिक पाळी अनियमित.
२. टेस्टोस्टेरॉनसारखे हार्मोन्सची पातळी वाढल्याने अंड्याची गुणवत्ता कमी होते.
३. इन्सुलिन पातळी प्रतिरोधक समस्यांची वाढ
४. इन्सुलिन वाढीमुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
पी.सी.ओ.एस.च्या या घटकांचा परिणाम जर प्रजननक्षमतेवर होत असेल, तर गर्भधारणा होऊच शकत नाही का? आणि पी.सी.ओ.एस.ग्रस्त स्त्री आई होऊ शकते का?
गर्भधारणा पी.सी.ओ.एस.मुळे अशक्य जरी असली तरी, काही प्रमाणात प्रजनन तज्ज्ञाकडून उपचार घेता येतील.
पी.सी.ओ.एस. आणि प्रजनन क्षमता उपचार
पीसीओएसवर कोणताही उपचार नाही, परंतु, योग्य काळजी घेतली तर ही समस्या कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, वजन कमी केल्याने काही प्रमाणात पीसीओएसची लक्षणे कमी होऊ शकतात. तसेच, कुटुंब नियोजन आणि अँटी-एंड्रोजनच्या गोळ्या घेतल्याने पीसीओएसच्या लक्षणांमध्ये सुधारणा येऊ शकतात.
आपण गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करीत असल्यास, पीसीओएस उपचारातील पहिली पायरी म्हणजे आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणणे, सकस आहार आणि व्यायामाचा त्यात समावेश करणे.कर्बोदके आणि ग्लायसेमिकचा भार कमी करणारे जिन्नस आहारात केव्हाही चांगले! आठवड्यातील किमान ३० मिनिटे आणि तीन वेळा व्यायामासाठी नियोजित करू शकता. शक्यतो, दररोज नियमित व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.
जीवनशैलीत बदल करून देखील गर्भाशयची समस्या असल्यास, तज्ज्ञांच्या सल्ल्याने फर्टिलिटी औषधांचे सेवन करू शकता. प्रजननासाठी काही निवडक इस्ट्रोजेन रिसेप्टर मॉड्युलेटर औषधे उपलब्ध आहेत.औषधांचे सेवन करूनदेखील जर गर्भधारणा होत नसेल तर बीजांड सोडण्यासाठी फर्टिलिटी इंजेक्शनची आवश्यकता लागते. फर्टिलिटी इंजेक्शन्समध्ये समप्रमाणात असणारी संप्रेरक, आपल्या मेंदूला गर्भाशयाला बीजांड बनविण्यासाठी सिग्नल देतात.
फर्टिलिटी डॉक्टर ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड आणि रक्त चाचण्यांद्वारे या प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवतात. कारण, या चाचण्यांद्वारे त्यांना एस्ट्रॅडिओल पातळीची (अंडाशयात तयार होणारे हार्मोन) नोंद ठेवण्यास मदत होते. मात्र,कधी क़़धी फर्टिलिटी इंजेक्शन्सचा नकारात्मक परिणाम असा होतो की त्यामुळे बहुविध जन्माचा धोका वाढतो.नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही ट्रीटमेंटनंतर देखील गर्भधारणा झाली नाही तर इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) चा मार्ग अवलंबता येतो.
पी.सी.ओ.एस.साठी आयव्हीएफ उपचार
आय.व्ही.एफ. पद्धतीमध्ये, डॉक्टर किरकोळ प्रक्रियेद्वारे जास्त बीजांडे तयार होण्याची इंजेक्शन देऊन, स्त्रीच्या अंडाशयातील बीजांडे बाहेर काढतात. प्रयोगशाळेत हे बीजांड पिकवले जातात, त्यानंतर यातील चांगल्या प्रतीचे बीजांड गर्भाशयात परत सोडले जातात. या उपचार पद्धतीने गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे रक्ताची चाचणी करून ठरवण्यात येते. तसेच, एम्ब्रियो फ्रीजिंग द्वारे भावी योजनेसाठी गर्भ गोठवण्याचा मार्ग देखील यात निवडता येतो.